Fri, Jul 19, 2019 07:12होमपेज › Marathwada › कर्जफेडीत जिल्ह्यातील महिला बचत गट अव्वल

कर्जफेडीत जिल्ह्यातील महिला बचत गट अव्वल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बीड : शिरीष शिंदे

शासकीय योजनेमार्फ त किंवा व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज काढून ते कर्ज बुडविणार्‍यांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे अनेकांना अर्थ सहाय्य करणारे महामंडळे कर्जबुडव्यांमुळे डबघाईस आले आहे. परंतु, याला जिल्ह्यातील महिला बचत गट अपवाद ठरल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळार्तंगत नोंदणीकृत असलेल्या व बँकांकडून कर्ज घेतलेल्या दीड हजारांहून अधिक बचत गटांनी 98 टक्के कर्जाची परतफे ड या वर्षभरात केली आहे. 

साधारणतः 2006-07  साली  महिला बचत गटांची संकल्पना समोर आली व त्याच कालावधीत बचत गट स्थापनेलाही प्रारंभ झाला. 10 पेक्षा अधिक व 20 पेक्षा कमी असलेल्या बचत गटांतील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हे मोठे व्यासपीठ निर्माण झाले. महिलांनी एकत्र येऊन स्वःतचा रोजगार निर्माण करावा, आर्थिक स्थैर्य प्राप्‍त करावे अशी यामागची भूमिका होती. विशेष म्हणजे महिला बचत गटांना विना अट, कोणत्याही तारणा शिवाय बँकाकडून 50 हजार, 1 लाखापासून ते 20-30 लाखा पर्यंत कर्ज मिळू लागल्याने महिला बचत गटांची संख्या जिल्ह्यात वाढत गेली.

बँकांकडून कर्ज घेऊन महिला स्वतःचा व्यवसाय जसे की, दुग्ध व्यवसास, किरणा दुकान, मसाले बनवून त्याची विक्री यासारखे असंख्य उद्योग महिला करू लागल्या. जिल्ह्यात आज घडीला 1 हजार 589 बचत गट आहेत. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत 126 बचत गटांची स्थापना झाली आहे. दिवसेंदिवस नवीन बचत गटांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, मोठ्या बँकांकडून कर्ज मिळविणे हे सहज शक्य नाही. बँकांमध्ये कर्जासाठी फ ाईल दिली की ती मंजूर होण्यास वर्ष किंवा त्या पेक्षाही अधिकचा कालावधी लागू शकतो असे अपेक्षित आहे, मात्र बचत गटाच्या बाबतीत असे होत नाही. बचत गटांना तत्काळ कर्ज पुरवठा होतो. 

बँका बचत गटांच्या दारी

महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहायक नियंत्रक सुरेश वाघमारे म्हणाले की, आयसीआयसीआय व आयडीबीआय या दोन व्यावसायिक बँकांचा शासनासोबत करार झाला आहे. त्यामुळे या बँकांचे प्रतिनिधी ग्रामीण भागात जाऊन बचत गटांना कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज देऊ करतात. कर्ज मंंजूर झाल्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी संंबंधीत बचत गटाच्या खात्यावर कर्जाची रक्‍कम जमा होते. कर्जाची रक्‍कम पूर्णपणे बँकेला वेळेवर दिल्यास पुन्हा नव्याने बचत गटास कर्ज प्राप्‍त होते. बचत गटास 6 महिने पूर्ण झाल्यानंतर कर्ज घेण्यास ते पात्र ठरतात.

7 कोटी 12 लाख रुपये दिले कर्ज

जिल्ह्यातील 1589 बचत गटांना या चालू वर्षात 7 कोटी 12 लाख रुपये कर्ज देण्यात आले होते. मार्च अखेर पर्यंत या सर्व बचत गटांनी जवळपास 98 टक्के रक्‍कम व्याजासह बँकांना परत दिली आहे. उर्वरीत 2 टक्के बचत गटांनी कर्ज बुडविले असे नसून बँकानी ठरवून दिलेल्या तारखांवर हप्‍ता देण्यास विलंब होतो. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखे ऐवजी विलंब झालेला हप्‍ता 10 किंवा 15 तारखेला दिला जातो, मात्र कर्जाचा हप्‍ता बुडत नाही. दरम्यान, बचत गट नियमित कर्ज फे डत असल्याने व्याजाचा दर हा जवळपास 7 टक्के असतो तर शासनही मदत म्हणून बचत गटांचे 7 टक्के व्याज भरते. यामुळे महिला बचत गटांना आधार निर्माण होतो. 


  •