Fri, Jan 18, 2019 04:44होमपेज › Marathwada › महिला डॉक्टर मृत्यूप्रकरण; खुनाचा गुन्हा

महिला डॉक्टर मृत्यूप्रकरण; खुनाचा गुन्हा

Published On: Mar 07 2018 2:44AM | Last Updated: Mar 07 2018 2:18AMजिंतूर  : प्रतिनिधी

शहरातील खैरी प्लॉट भागात राहणार्‍या महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा 6 मार्च रोजी दाखल करण्यात आला. पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने सदरील खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आहे. मात्र गुन्हा दाखल होताच आरोपीने पलायन केले. बीड जिल्ह्यातील शिरपूरा (ता.केज) येथील डॉ.मिरा हिचे लग्न मे 2010 साली दुसरबीड (ता.सिंदखेड राजा) येथील डॉ.गणेश याच्यासोबत  झाले होते. 2012 साली डॉ.गणेश याने जिंतूर शहरात एक प्लॉट खरेदी केल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णालय बांधण्याकरिता डॉ.मीरा हिच्या माहेरी पाच लाखाची मागणी सुरू केली. तसेच पैशांची वेळेवर पूर्तता होत नसल्याने त्याने पत्नीस शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

यामुळे डॉ.मीरा हिच्या वडिलांनी जवळपास तीन लाख रुपये गणेशच्या बँक खात्यावर वर्ग केले होते. त्यानंतर औरंगाबाद येथे प्लॉट घेतला असल्याची बतावणी करून सासर्‍याकडे आणखी पाच लाखांची मागणी केली. मात्र सासरे सेवानिवृत्त कर्मचारी असल्याने त्यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली व त्यातच त्यांच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने ते गावी निघून गेले. यानंतर 5 मार्च रोजी दुपारी 4.30 सुमारास गणेशच्या वडिलांनी डॉ. मीरा हिच्या वडिलांशी मोबाइलवर कॉल करून तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. यानंतर पती डॉ.गणेश सानप,सासरा शिवाजी सानप, सासू सुमन सानप तसेच गणेशचे मामा ढाकणे यांनी संगनमत करून मीराचे तोंड दाबून खून केला असल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली. यावरून पोलिसात अर्जुन केदार यांच्या फिर्यादीवरून पती,सासू,सासरा व मामा यांच्याविरुद्ध  गुन्हा झाला.