Sun, Nov 18, 2018 21:48होमपेज › Marathwada › 'नकोशी' सापडली काट्याच्या झुडपात

'नकोशी' सापडली काट्याच्या झुडपात

Published On: Apr 28 2018 3:16PM | Last Updated: Apr 28 2018 3:16PMगेवराई : प्रतिनिधी

गेवराई शहरापासुन १५ किलोमीटर असलेल्या शहागड येथील निवांत धाब्याजवळ शुक्रवारी रात्री जिवंत स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबल उडाली आहे. 

या घनेची आधिक माहिती अशी की, गेवराई शहरातील मजूर महिला शहागड येथील निवांत धाब्यावर स्वयपाक काम करण्यासाठी जात असते. शुक्रवारी रात्री १० वाजता महिला आपले काम संपवून गेवराईकडे परत जात असताना महिलेला धाब्याच्या पाठीमागे लहान मुल रडण्याचा आवाज आला. मजूर महिलेने त्या दिशेने जाऊन पाहिले असता तेथे दोन दिवसाचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक काट्याच्या गवतात  फेकल्याचे निर्दशनास आले. यानंतर महिलाने याची माहिती धाबा मालकास दिली त्यांनी शहागड पोलिसांना या घटनेची माहिती फोनवरून पोलिसांना कळवली. पोलिसांनी पंचनाम करून हे अर्भक गेवराई शहरातील अनाथालयात सुपूर्द केले आहे. सदर अर्भक कोणी फेकले याचा तपास पोलिस करीत आहेत.