Thu, Dec 13, 2018 23:08होमपेज › Marathwada › पोटच्या मुलीवर बापाचा बलात्कार

पोटच्या मुलीवर बापाचा बलात्कार

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 28 2018 12:06AMबीड : प्रतिनिधी 

स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर बापाने पाच वर्ष वेळोवेळी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील एका 13 वर्षीय मुलीवर  पित्याकडूनच अत्याचार होत होते. पीडित मुलगी तिसरीमध्ये असल्यापासून ते एप्रिल 2018 पर्यंत पित्याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. या बाबतची माहिती कोणालाही सांगू नये म्हणून तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पुणे येथील समर्थ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून तो आष्टी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. आष्टी पोलिस ठाण्यात नराधमाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यासह इतर कलमान्वये 26 जून रोजी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि.भुतेकर हे करीत आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पुणे येथील बाल निरिक्षण गृहाच्या अधिक्षिका लता राठोड यांच्याशी संपर्क केला असता ही गोपनीय माहिती असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला, तसेच पोलिस निरिक्षक सपोनि एस.डी.भुतेकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद होता.