Sun, May 19, 2019 22:00होमपेज › Marathwada › पिस्तूलचा धाक दाखवून पित्याला मारहाण

पिस्तूलचा धाक दाखवून पित्याला मारहाण

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 20 2018 10:56PMसेनगाव : प्रतिनिधी

सेनगावात पित्यासोबत मुलाचा पैसे देण्याघेण्यातून वाद असताना 18 जुलैला पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याला पिस्तूलचा धाक दाखवून मारहाण केल्याने मुलासह सून अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सेनगाव समतानगरमध्ये भगवान खाडे व त्यांचा मुलगा राजेश खाडे यांच्यात पैसे घेण्याच्या देण्याच्या वादामुळे राजेश खाडे व सविता खाडे हे दोघेजण नांदेड येथे राहण्यास गेले होते. 18 जुलै रोजी राजेश खाडे यांने आपले वडील भगवान राजाराम खाडे यांच्या घरामध्ये अनधिकृतरीत्या राजेश प्रवेश करून त्यांच्याकडे रक्कम मागितली. असता ही रक्कम देण्यास भगवानराव खाडे यांनी नकार दिल्याने मुलगा राजेश खाडे याने पिस्तूलचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

भगवान खाडे यांनी सेनगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादिवरून राजेश भगवान खाडे, सविता राजेश खाडे, संतोष भीमराव  फड रा. नांदेड या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील 30 हजार रुपयांचे गावठी पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतले.