Sun, Apr 21, 2019 00:16होमपेज › Marathwada › अनुदानासाठी शेतकर्‍यांचे उपोषण

अनुदानासाठी शेतकर्‍यांचे उपोषण

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 11:48PMगंगाखेड : प्रतिनिधी

इसाद परिसरात फेब्रुवारीमध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. बोडअळीने संपूर्ण कापूस शेतकर्‍यांच्या हातचा गेला. शासनाच्या अनुदान यादीत इसाद येथील शेतकर्‍यांना समाविष्ट करून घेण्यासाठी तहसील कार्यालयासमोर शेतकर्‍यांनी दि.6 एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

तलाठी व कृषी कार्यालयाचा निरंक अहवाल त्वरित रद्द करून दुसरा अहवाल देऊन महसूल प्रशासनाची दिशाभूल करणार्‍यांवर निलबंनाची कार्यवाही करावी, गारपीटग्रस्त यादीत समाविष्ट करून आर्थिक मदत देण्यात यावी, खरीप पीकविमा देण्यात यावा या मागणीसाठी भगवानराव सातपुते, भाऊसाहेब भोसले, उध्दव सातपुते, लक्ष्मण भोसले, कोंडीबा टोकलवाड, सीताराम देवकते, बाबूराव पौळ, तुकाराम भोसले, रामराव भोसले, गोंविद भोसले, गणेश सातपुते, विठ्ठलराव भोसले यांच्यासह असंख्य शेतकरी सहभागी झाले आहेत.

Tags : Marathwada, Farmers, fasting, subsidy