Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Marathwada › बोंडअळी प्रश्‍नावर शेतकऱी द्विधा मनःस्थितीत

बोंडअळी प्रश्‍नावर शेतकऱी द्विधा मनःस्थितीत

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 9:14PMशिरूर : जालिंदर नन्नवरे 

बोंड अळीने मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यांनी यंदा चांगलीच धास्ती घेतली आहे. नवनवीन कंपन्यांचे वेगवेगळे वाण बाजारात उपलब्ध असताना शेतकरी मात्र द्विधा मनःस्थितीच्या चक्रव्युव्हाच्या कैचीत सापडला आहे. त्यांना आता सकारात्मक मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे, मात्र तसे होताना दिसत नसून प्रशासनाने पुढे सरसावून गाव पातळीवर शेतकर्‍यांना सुयोग्य मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. बोंडअळीची चिंता अजूनही शेतकर्‍यांना आहे, त्याचे व्यवस्थापन कसे करावे, हे सांगणेही महत्त्वाचे आहे. 

गेल्या दोन तीन वर्षांचा मागोवा घेतल्यास अनेक शेतकर्‍यांना शेती व्यवसाय नकोसा झाल्याचे विदारक आणि तेवढेच गंभीर चित्र तालुक्यात पहावयास मिळते. गेल्या चार वर्षांपासून ज्या देशाची आर्थिक सुबत्ता कृषी प्रधान देशाचा पोशिंदा म्हणून शेतकर्‍यांच्या भरवशावर पहिल्या जाते तोच आज डळमळीत झाला आहे. विविध संकटे मागावर असताना संकटाच्या मालिकेत गेल्या हंगामात गुलाबी बोंड अळीने एन्ट्री मारून होत्याचे नव्हते केले. असे असताना बियानाबाबत शेतकर्‍यांत चिंतेचे सावट अजूनही कायम आहे.

गुलाबी बोंडअळीची धास्ती घेऊन बसलेल्या शेतकर्‍यांना यंदा योग्य मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. वाणाचे वेगवेगळे आमिष दाखवून काही व्यापार्‍यांचे शेतकर्‍यांना जाळ्यात ओढण्याचे काम ग्रामीण भागात सुरू आहे. बियाणांबाबत शेतकर्‍याच्या मनात कालवाकालव सुरू आहे. कोणते बियाणे खरेदी करावे; आउटपूट कसे असेल हे येणार्‍या दिवसात कळेलच. गुलाबी बोंड अळी बाबत संभ्रम कायम मनात घर करून असताना शासन प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवण्याचे सुरू आहे. योग्य मार्गदर्शन नसल्याने नेमके कोणते बीज रोपण करावे या बाबत शेतकरी संभ्रमात आहे, मात्र यात मार्गदर्शनाचा अभाव असल्याने प्रशासनाला वरपास की नापास झाले समजावे हे न उलगडणारे कोडे आहे. 

मार्गदर्शनला होतोय विलंब

बोंडआळी संदर्भात शेतकरी द्विधा मनस्थितीत असताना तालुक्यातील कृषी विभागामार्फत मार्गदर्शन शिबिरे राबवली जात आहेत, परंतु या शिबिरांना खूप विलंब लागत असल्याने शेतकर्‍यांसमोरील अडचणीत आणखी वाढ होत आहे.