Fri, Jul 19, 2019 18:40होमपेज › Marathwada › बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांची झुंबड

बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांची झुंबड

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 11 2018 12:52AMबीड : प्रतिनिधी

जिल्हाभरात मॉन्सूनपूर्व पाऊस बर्‍यापैकी झाल्याने आणि आताही पाऊस होत असल्याने शेतीची पेरणीपूर्व मशागत आटोपली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची आता बियाणे, खत खरेदीसाठी कृषी दुकानांवर झुंबड उडत आहे. सध्या कपाशी बॅगचे दर एमआपीपेक्षा कमी असून खतांच्या वाढत्या दराची मात्र शेतकर्‍यांना झळ सहन करावी लागत आहे. 

यावर्षी मॉन्सूनपूर्व पाऊस जिल्हाभरात चांगला झाला आहे. जिल्ह्यात जवळपास एक जूनपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. अंबाजोगाई, माजलगाव, नांदूरघाट अशा मंडळात तर अतिवृष्टी झाली आहे. यासह इतर ठिकाणीही चांगला पाऊस झाला आहे. शनिवारी केज, बीडमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे रविवारी बीड येथील कृषी दुकानांवर शेतकर्‍यांनी बियाणे, खत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. 

गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी उसाची अधिक लागवड केली आहे, तसेच कापूस वेचणीला 20 रुपयांचा दर व बोंडअळीने झालेले नुकसान यामुळे शेतकर्‍यांचा कापूस लागवडीकडे गतवर्षीप्रमाणे कल दिसून येत नाही. शेतकरी सध्या विविध  कपाशी बॅगची एमआरपी 740 रुपये आहे. मात्र, बीडच्या मार्केटमध्ये बर्‍याच कपाशीचे वाण प्रति पॉकेट 700 रुपयांनी रविवारी विक्री होत होते. कपाशीसह यंदा तूर, मूग, बाजरी, उडीद लागवडीकडेही शेतकर्‍यांचा बर्‍यापैकी कल असल्याचे विक्रेते परमेश्‍वर घोडके यांनी सांगितले. 
यावर्षी खतांच्या किमतीमध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय खताची गोणी पूर्वी 50 किलोची असायची. यावर्षी आता काही खतांच्या गोणी या 45 किलोच्या झाल्या आहेत. 

पेरणीनंतर खतांचा काळाबाजार होऊ नये, खतांसाठी अधिक पैसे देण्याची वेळ येऊ नये, यासाठी शेतकरी आताच खतही खरेदी करीत   आहेत.