Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Marathwada › मावेजासाठी शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा इशारा

मावेजासाठी शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा इशारा

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 18 2018 12:07AMपरभणी : प्रतिनिधी 

जिंतूर तालुक्यातील सावरगांव तांडा, ब्राह्मणगाव गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी लघुसिंचन (जलसंधारण) विभाग जालना यांनी पाझर तलावासाठी मागील 7 ते 8 वषार्र्ंपूर्वी संपादित केल्या होत्या. मात्र अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना त्याचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकर्‍यांसमोर कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा टाकला. म्हणून संबंधित शेतकर्‍यांना तत्काळ मोबदला द्यावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

जिंतूर तालुक्यातील सावरगांव, ब्राह्मणगाव गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी  पाझर तलावासाठी घेऊन तब्बल सात ते आठ वषार्र्ंचा काळ ओलांडला आहे, परंतु जमिनी संपादित करताना अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना लवकर मावेजा मिळून दिला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र आजपयर्र्ंत मावेजा मिळाला नाही. यातच भूसंपादन कार्यालयाकडून अडवणूक करण्यात येत आहे. तसेच तत्कालीन भूसंपादन अधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी पैशाची मागणी केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही करून रंगेहाथ पकडले होते.

याच सूडबुद्धीने प्रशासनाची दिशाभूल करून शेतकर्‍यांची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चुकीची स्थळ पाहणी अहवाल सादर केला असल्याचा आरोप यात केला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे मानसिक खच्चिकरण होत आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या जमिनीचे खोदकाम केल्याने त्यामध्ये कोणतेही पिक घेता येत नाही.याचा मोबादलाही न मिळाल्याने शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातून मोठे आर्थिक संकट उभे राहत असल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. 

येत्या 8 दिवसांत मोबदला देण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने केली नाही तर सामूहिक अन्नत्याग आंदोलन किंवा आत्मदहन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर सावरगाव, ब्राह्मणगाव येथील महिलांसह पुरुष शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.