Tue, Feb 19, 2019 17:14होमपेज › Marathwada › बीड : कर्जबाजारी तरुण शेतकर्‍याची आत्महत्या 

बीड : कर्जबाजारी तरुण शेतकर्‍याची आत्महत्या 

Published On: Dec 06 2017 8:08PM | Last Updated: Dec 06 2017 7:49PM

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी 

कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वडवणी तालुक्यातील खापरवाडी येथील तरूण शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली.  विजय अंकुश लंगडे असे या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी, वडवणी तालुक्यातील खापरवाडी येथील विजय अंकुश लंगडे वय (40) यांची दोन एकर शेती आहे. या जमिनीवरच शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या वर्षी त्यांनी कापसाच्या पिकांची लागवड केली होती. पिक जोमात आले असता गेल्या महिन्यात कापसावर सेंद्रिय बोंडअळीने आक्रमण केले. या रोगामुळे संपुर्ण कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याच निराशे पोटी त्यांनी काल मंगळवारी शेतात जाऊन विष प्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी आंबाजोगाई येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले असताच, उपचारा दरम्यान त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला.