Fri, Jul 19, 2019 23:04होमपेज › Marathwada › लोकप्रतिनिधींना जागा दाखवा : रघुनाथदादा पाटील

लोकप्रतिनिधींना जागा दाखवा : रघुनाथदादा पाटील

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:28PMबीड : प्रतिनिधी

उद्योगपतींचे उखळ पांढरे व्हावे, यासाठी सरकारकडून जाणीवपूर्वक शेतमालांचे दर पाडले जात आहे. खासदार-आमदार संगनमताने शेतकर्‍यांची लूट करीत आहेत, अशी लूट करणार्‍या लोकप्रतिनिधींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले. ते बीड येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची शेतकरी जागर यात्रा शनिवारी व रविवारी बीड जिल्ह्यात होती. या यात्रेत रघुनाथदादा पाटील, कालीदासदादा आपेट, प्रा. सुशीलाताई मोराळे, गणेश जगताप, किशोर ढमाले, शिवाजीराव नांदखिले यांनी शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, हमीभाव देण्याची मागणी केली. या जागरण यात्रेस शेतकर्‍यांचा मोठा सहभाग मिळाल्याचेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. 

पत्रपरिषदेत रघुनाथदादा पाटील म्हणाले, की कृषी मूल्य आयोग शेतीमालाचा उत्पादन खर्च काढताना कमीत-कमी आधारभूत किंमत जाहीर करते, यामुळे बाजार समितीत शेती मालाला योग्य किंमत मिळत नाही, परिणामी शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. पिकांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने चार लाखांवर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्येस आमदार, खासदार जबाबदार आहेत.

मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत असताना लोकप्रतिनिधींना झोप तरी कशी येते? अशी टीकाही रघुनाथदादा यांनी केली. व्यापार्‍यांचे हित जोपाण्याचे काम सरकार करते, व्यापार्‍यांना स्वस्तात माल कसा मिळेल, अशी सरकारची धोरणे आहेत. अशा सरकारसह खासदार, आमदार यांना शेतकर्‍यांनी धडा शिकवावा, असे आवाहन रघुनाथ दादा पाटील यांनी केले. शेतकर्‍याची संगनमत करून लूट करणार्‍या खासदार, आमदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून त्यांना फासावर लटकावे, अशी मागणीही त्यांनी केले.

 

Tags : beed, beed news, steering committee, Jagar Yatra,