Wed, Feb 20, 2019 10:39होमपेज › Marathwada › महिला पोलिसावर बलात्कार; पोलीसासह तिघांवर गुन्हा 

महिला पोलिसावर बलात्कार; पोलीसासह तिघांवर गुन्हा 

Published On: Mar 03 2018 5:12PM | Last Updated: Mar 03 2018 5:12PMबीड : प्रतिनिधी 

येथील महिला पोलिसावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह तिघांवर बलात्कार व अॅट्रासिटीचा गुन्हा आष्टी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे. 

सध्या परळी ठाण्यामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी अत्याचार केल्याचा आरोप महिला पोलिसाने केला आहे. गवळी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना वॉकीटॉकीची बॅटरी संपल्याचे कारण सांगुन घरी बोलावले व इतर दोघांच्या मदतीने अत्याचार केल्याचे महिला पोलिसाने सांगतिले.

याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उप अधिक्षक पाटील करीत आहेत.