Mon, Jul 22, 2019 13:11होमपेज › Marathwada › उशीरा येणार्‍या बावीस विद्यार्थ्यांना परीक्षेत नो एन्ट्री

उशीरा येणार्‍या बावीस विद्यार्थ्यांना परीक्षेत नो एन्ट्री

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 10:52PMबीड : प्रतिनिधी

राज्य गुप्त वार्ता अधिकारी पदासाठी शनिवारी परीक्षा घेण्यात आल्या. बीड येथील एका केंद्रावर विद्यार्थी काही वेळ उशीरा आले. या उशीरा येणार्‍या विद्यार्थ्यांना व काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांना परीक्षा हॉलमध्ये परीक्षा केंद्रावरील अधिकर्‍यांनी प्रवेश दिला नाही. यामुळे विद्यार्थी हिरमुसले होते. 

बीड येथील यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक या केंद्रावर शनिवारी राज्य गुप्त वार्ता अधिकारीपदासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची वेळ दुपारी साडेबाराची होती, मात्र परीक्षार्थी विद्यार्थ्यांना 11 वा. परीक्षा केंद्रावर बोलाविण्यात आले होते. काही विद्यार्थी 15 ते 20 मी. उशीरा आले. सदरील विद्यार्थ्यांनी आम्ही पावसासह इतर कारणांमुळे सव्वाअकरा वाजता आलो, मात्र अजून परीक्षेची वेळ झाली नाही, आम्हाला परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश द्या, अशी विनंती केली, मात्र परीक्षा केंद्रावरील अधिकार्‍यांनी त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला नाही. यामुळे जवळपास 22 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. यानंतर काही विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींकडे धाव घेतल्याचे समजते, मात्र उपयोग झाला नाही.