Tue, Apr 23, 2019 21:49होमपेज › Marathwada › धोंडे जेवणातून पर्यावरण जनजागृती

धोंडे जेवणातून पर्यावरण जनजागृती

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 10:24PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

तालुक्यातील आपेगाव ग्रामपंचातीच्या वतीने 1 मे 2017 ते 12 मे 2018 या कालावधीत विवाह झालेल्या नवदांम्पत्यांना धोंडे जेवण देण्यात आले. या प्रसंगी धोंडे जेवणासोबत मतदार यादीत नाव नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती करून विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र ही देण्यात आले, तसेच पर्यावरण जनजागृती व्हावी या उद्देशाने 29 नवदाम्पत्यांना वृक्षरोप भेट दिले.

आपेगाव येथे मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव उबाळे, तहसीलदार संतोष रुईकर,मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, हातोला गावचे सरपंच अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, गोविंद शेळके, संजय काळे, आपेगावच्या सरपंच प्रियंका निलेश शिंदे, उपसरपंच महादेव भोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा देताना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पर्यावरण जनजागृतीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. एकत्र समाजात कुटुंबपद्धती राहिली पाहिजे, नवदाम्पत्यांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे, आई-वडिलांचा सांभाळ करा असे आवाहन केले. अ‍ॅड. जयसिंग चव्हाण व प्रियंका  निलेश शिंदे यांच्या सारखे सरपंच अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याचे सांगुन प्रामाणिक, सज्जन लोकांनाच यापुढे चांगले दिवस येतील त्यामुळे सतत कार्यमग्न रहा, चांगले काम करा, असे सांगून त्यांनी आपेगाव ग्रामपंचायतीने सदरील उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन केले. एक झाड व एक मूल हा  नारा राजेसाहेब देशमुख यांनी यावेळी दिला.

निलेश शिंदे म्हणाले, की 30 डिसेंबर 2017 रोजी सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच ग्रामसभेत ग्रामस्थांच्या अडीअडचणी व विविध प्रश्न सोडविण्यासाठी विचार विनिमय झाला.   अधिक मास असल्याने धोंडे जेवण निमित्ताने नवदाम्पत्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देत आहोत.  मतदार यादीत नाव नोंदणी करीत आहोत अशी माहिती त्यांनी दिलीमतदार यादीत नाव नोंदणी करीत आहोत अशी माहिती त्यांनी दिली वृक्ष लागवडीसाठी मानवलोकच्या वतीने करण्यात येत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत 500 वृक्षरोपांची लागवड करणार असल्याचे निलेश शिंदे म्हणाले. या प्रसंगी तहसीलदार संतोष रुईकर यांनी उपक्रमाचे कौतुक करून नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आपेगाव ग्रामपंचायत सदस्य भास्कर शिंदे, सुवर्णमाला सरवदे, सचिन आचार्य, ग्रामसेवक रघुनाथ सरवदे, शिवाजीकाका शिंदे, अविनाश तट, बालासाहेब तट, रंगनाथ तट, द्रौपदी  खुळे, मनीषा  तट, आश्रूबा महाराज कुरुडे यांच्यासहीत नवदाम्पत्यांचे नातेवाईक, महिला, प्रतिष्ठीत नागरिक यांची उपस्थिती होती.

गाव समस्या सोडविण्यास प्राधान्य

निलेश शिंदे म्हणाले, की 30 डिसेंबर 2017 रोजी सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच ग्रामसभेत ग्रामस्थांच्या अडीअडचणी व विविध प्रश्न सोडविण्यासाठी विचार विनिमय झाला. यावेळी झालेल्या चर्चेत प्रकर्षाने मतदार यादीत नांवनोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती बाबत अनेकांनी आपले विचार मांडले, तसेच भूमिपुत्रांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आदी उपक्रम राबविण्यात आले.