Wed, Jan 16, 2019 17:35होमपेज › Marathwada › अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केले रॉकेट लाँचिंग

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केले रॉकेट लाँचिंग

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:25AMजालना : प्रतिनिधी

मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये यांत्रिकी विभाग विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वॉटर रॉकेट लाँचिंग स्पर्धेत विद्यार्थ्यानी रॉकेट लाँचिंग केले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रा. एम. आर. गायकवाड हे होते.  यानंतर विद्यार्थ्यांनी बनवलेले रॉकेट लॉच करून दाखविले. यावेळी प्रा. आर. एल. करवंदे, प्रा. सुशीलकुमार देशमुख, प्रा. पंकज भोयर, प्रा. स्वप्निल ढोले, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन यांत्रिकी विभाग विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी विवेक खंडेलवाल, गौरव पांडेय, दुर्गेश काबरे, अजय देशमुख, सोहन चौंडीये, ओंकार चौंडीये, पांडेय आदींनी केले होते. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.