होमपेज › Marathwada › शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा 

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा 

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 12 2018 10:23PMबोरी : प्रतिनिधी 

येथील शेतकरी मित्र कृषीसेवा केंद्राचा विद्युत पुरवठा का खंडित केला म्हणून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍याला मारहाण केली. ही घटना 10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता घडली.  या प्रकरणात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अधिकार्‍याविरुद्धही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

येथील 33 केव्ही विद्युत उपकेंद्राकडून 8 व 9 मार्च  रोजी बोरी गावात थकबाकीदारांची विद्युत पुरवठा बंद करून वसुलीचे काम सुरू होते. बसस्थानकावर शेतकरी मित्र कृषी केंद्राकडे वीजबिल दीड लाख रुपये थकबाकी असल्यामुळे वीजपुरवठा बंद केला.

याबाबत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख महावितरण कार्यकारी अभियंता सूर्यकांत  रणभारे यांना जाब विचारत असताना वाद झाला. रणभारे यांनी बोरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवर म्हटले की, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी वीजपुरवठा का बंद केला म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली व सरकारी कामात अडथळा  आणला म्हणून जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्यावर बोरी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला.