Wed, Sep 19, 2018 23:59होमपेज › Marathwada › #Women’sDay रेशीम शेतीतून महिलेने साधली आर्थिक प्रगती 

#Women’sDay रेशीम शेतीतून महिलेने साधली आर्थिक प्रगती 

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 2:06AMपूर्णा : सतीश टाकळकर 

गोदावरी नदीकाठी वसलेल्या देवठाणा येथील आशाताई मधुकर जोगदंड यांनी शेतीपूरक रेशीम व्यवसायाच्या माध्यमातून पाऊणेदोन लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.

निसर्गावर अवलंबून असणार्‍या शेती व्यवसायावर शेतकर्‍यांना आर्थिक संकटास तोंड द्यावे लागते. शेतीपूरक व्यवसाय केला तर त्यातून आर्थिक स्थिरता साधता येते, ही बाब लक्षात घेऊन आशाताई जोगदंड यांनी रेशीम शेती करण्याचा निश्‍चय केला. यासाठी दोन एकरवर तुतीची लागवड केली. लाकडी शेड उभारून रेशीम अळ्यांचे संगोपन सुरू केले. त्यांचे पती मधुकर जोगदंड हे त्यांना या कामात मदत करतात. आशाताई स्वतः तुतीचा पाला रेशीम अळ्यांना खाद्य म्हणून पुरवितात. अंडी ते रेशीम कोषनिर्मितीपर्यंतची सर्व काळजी त्या स्वतः घेत असतात. वास्तविक पाहता रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी चांगल्या निवार्‍याची गरज असते, परंतु  जोगदंड यांनी लाकडी निवारा उभारून त्यामध्ये रेशीम अळ्यांचे संगोपन सुरू केले. गेल्यावर्षी पाच टप्प्यांमध्ये मिळालेल्या रेशीम कोषातून पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मराठवाडा कृषी विधापीठातील डॉ. आनंद गोरे, प्रा. पी. डी.पटाईत यांच्यासह जिल्हा रेशीम उद्योग केंद्राचे मार्गदर्शन जोगदंड यांनी घेतले. वर्षातून चार ते पाच वेळा रेशीम कोष निर्मिती होते. हे रेशीम कोष बंगळूर परिसरातील रामनगर येथील बाजारपेठेत नेऊन विक्री केली जाते.