Mon, Jun 24, 2019 20:57होमपेज › Marathwada › प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार स्वतंत्र इमारत

प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार स्वतंत्र इमारत

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 22 2018 12:57AMबीड : प्रतिनिधी

इमारत नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला अद्यावत अशी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.  बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या माध्यमातून इमारत नसलेल्या प्रत्येक गावात ग्रामपंचायत इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी 15 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींना हक्काची स्वतंत्र इमारत मिळणार आहे. 

बीड जिल्ह्यात 1027 ग्रामपंचायती आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी 63 ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी निधी दिला होता. ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाची विभागणी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आता दोन प्रकारात करण्यात आली आहे. पहिल्या प्रकारात एक हजार ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या व स्वत:ची  ग्रामपंचायत कार्यालय नसलेल्या ग्रामपंचायतींना या अगोदर या योजनेअंतर्गत कार्यालय बांधकामास 18 लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती, त्यात 90 टक्के शासनामार्फत व उर्वरित 10 टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने खर्च करावयाची होती, आता नवीन बदलानुसार 85 टक्के म्हणजे 15 लाख 30 हजार इतका खर्च शासन व 15 टक्के म्हणजे 2 लाख 70 हजार खर्च ग्रामपंचायतीने खर्च स्व-उत्पन्नातून करायचा आहे. दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना या अगोदर ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी तरतूद नव्हती पण आता नवीन सुधारित योजनेतंर्गत तशी तरतूद करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यासाठी सन 2018-19 या वर्षासाठी रुपये 55 कोटी इतका अर्थसंकल्पित करण्यात आला असून आहे. प्रतिवर्षी रुपये 142 कोटी 43 लाख प्रमाणे  पुढील चार वर्षांसाठी रुपये 569 कोटी 72 लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ग्रा.पं. कार्यालयाचे बांधकाम सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्वावर करण्यास वाव असल्यास संबंधित जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्ता अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या समितीने संबंधित ग्रामपंचायतीस त्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.