होमपेज › Marathwada › ऑनलाइन चोरट्यांना ई-वॉलेटचा आधार; तपास झाला अवघड

ऑनलाइन चोरट्यांना ई-वॉलेटचा आधार; तपास झाला अवघड

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:38PMबीड : शिरीष शिंदे

 तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे, कार्ड ब्लॉक झाले आहे अशी बतावणी करत सर्व सामान्यांच्या बँक खात्यावरून पैसे काढण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. आता तर ऑनलाइन चोरट्यांना नवीन फं डा सापडला आहे. सर्व सामान्यांची रक्कम थेट ई-वॉलेटवर ट्रान्सफ र करून ती पुन्हा अन्य बँक खात्यांवर वळवून काढली जात असल्याचे समोर आले आहे.  
मोबाईल बँकिंगसह ई-वॉलेटची संख्या वाढत असून त्याचा लाभ बँक ग्राहकांना होत आहेत. पैसे ट्रान्सफ र करणे, खात्यावर पैसे जमा करणे अशी कामे चुटकीसरशी होतात. पूर्वी याच कामांना तासन्तास लागत असत. यामुळे ग्राहकांचा वेळ खर्च होतो, शिवाय बँकातील गर्दी कायम रहात. यावर पर्यात म्हणून एटीएममध्ये पैसे ठेवणे, बँकेचे अधिकृत मोबाइल अ‍ॅप तयार करून ते नियमित मेंटेन करण्यावर राष्ट्रीयीकृत बँकांसह व्यावसायिक बँकांनी भर दिला आहे. त्यामुळे अनेकांसाठी बँकीग व्यवहार सुरुळीत झाला आहे, मात्र याचा फ ायदा ऑनलाइन चोरट्यांना होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्राहकांनी सर्तक राहणे आवश्यक ठरत आहे.

देशभरात 180 प्रकारचे ई-वॉलेट 

 एका पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आजच्या घडीला 180 प्रकारचे  ई-वॉलेट  सुरू आहेत. पूर्वी ग्राहकांना एटीएम कार्डचा पासवर्ड विचारून फ सवणूक केली जात होती.