होमपेज › Marathwada › दुरांतो एक्‍सप्रेसमध्ये दरोडा, महिलेचे मंगळसूत्र पळविले

दुरांतो एक्‍सप्रेसमध्ये दरोडा, महिलेचे मंगळसूत्र पळविले

Published On: Jul 20 2018 11:23AM | Last Updated: Jul 20 2018 11:23AMइगतपुरी : वार्ताहर

मध्य रेल्वेच्या दुरांतो एक्सप्रेसमध्ये तीन ते चार अज्ञात व्‍यक्‍तींनी दरोडा टाकून एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना चालत्या रेल्‍वेत घडली. याबाबत इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

अनिता चिंचोलीया ( वय ५०, रा. नागपूर ) या दि.१९ रोजी रेल्‍वे (क्र. १२२९०) दुरांतो एक्सप्रेस नागपूर ते मुंबई असा प्रवास करत होत्या. दि. २० रोजी ही एक्सप्रेस रात्रीच्या सुमारास भुसावळ स्थानकावरून निघाल्यानंतर माहिजी ते मसावत दरम्यान रेल्‍वे थांबली असता एका अज्ञात इसमाने अनिता चिंचोलीया यांचे गळ्यातील १३ ग्रॅमचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळून गेला. त्यांनी लागलीच गाडीचे दरवाजे जवळ जाउन बघीतले असता तीन ते चार इसम पळत जावुन मागील कोचमध्ये चढतताना त्यांना दिसले असल्याची फिर्याद चिंचोलीया यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलिसात दिली. आहे.