Mon, May 27, 2019 06:56होमपेज › Marathwada › एटीएममधून निघताहेत फाटक्या नोटा

एटीएममधून निघताहेत फाटक्या नोटा

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:14PMवसमत : प्रतिनिधी

वसमत शहरातील सत्याग्रह चौकातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पाचशे रुपयांच्या फाटक्या नोटा निघत आहे.  बँक त्या नोटा घेण्यास नकार देत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वसमत शहरात विविध ठिकाणी बँकांनी ग्राहकांच्या सुविधेसाठी एटीएम बसविले आहे. त्या पैकी सत्याग्रह चौकातील एसबीआय बँकेच्या एटीएममधून दि. 14 जून रोजी ग्राहक रक्कम काढण्यासाठी गेले असता, एका पाठोपाठ अनेकांना पाचशे रुपयांच्या फाटक्या नोटा तसेच त्यास पांढरे कागद चिटकवलेल्या अवस्थेत निघाल्या. सदरील प्रकार संबंधित बँकेच्या शाखेस ग्राहकांनी सांगितले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले. बँकेकडून एटीएम मध्ये फाटक्या नोटा ठेऊन ग्राहकांना त्रास देण्याच्या घटनेने ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

संबंधितांनी ग्राहकांचे हित जोपासत एटीएममध्ये फाटक्या नोटा न ठेवता चांगल्या नोटा ठेऊन ग्राहकांना सहकार्य करावे व एटीएममधून निघालेल्या फाटक्या नोटा बँकेने परत घ्याव्यात जेणे करून ग्राहकांचे नुकसान होणार नाही.एटीएममधून रक्कम काढली असता पाचशे रुपयांच्या फाटक्या नोटा व त्यास पांढरे कागद चिटकविलेल्या निघाल्या. बँकेत या नोटा संदर्भात विचारपूस केली असता उडवा उडवीचे उत्तरे मिळाली. बँकेच्या बेजबाबदार पणामुळे नाहक त्रास सहन करावा लागला असल्याची प्रतिक्रीया शे. सत्तार यांनी दिली.