Tue, Apr 23, 2019 21:58होमपेज › Marathwada › प्रधानमंत्री घरकूल योजनेचे बोगस लाभार्थी

प्रधानमंत्री घरकूल योजनेचे बोगस लाभार्थी

Published On: Feb 02 2018 1:34AM | Last Updated: Feb 02 2018 12:00AM
कौसडी : प्रतिनिधी

येथील प्रधानमंत्री घरकूल योजनेत बोगस लाभाथीर्र्ंना लाभ देऊन त्यांच चांगभल करत गटविकास अधिकार्‍याने  खर्‍या लाभार्थींना घरकुलापासून वंचित ठेऊन अंधारात लोटले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी वंचित लाभाथीर्र्ंनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे न्याय हक्क मागण्यासाठी धाव घेत निवेदन दिले आहे.

परभणी जिल्ह्यातील कौसडी ग्रा.पं.च्या वतीने सन 2011 च्या अहवालानुसार 176 नागरिकांची प्रधानमंत्री घरकूल योजनेसाठी 2017 मध्ये निवड करण्यात आली होती.मात्र काही कारणांवरून यादीमधील समाविष्ट लाभार्थींपैकी खर्‍या 61 लाभार्थीर्ंना वगळून त्यांच्यावर अन्याय केल्याची बाब समोर आली आहे. या घरकूल योजनेतील पात्र लाभार्थींच्या यादीमधून नावे वगळण्यात आलेल्या लाभधारकांनी पंचायत समिती कार्यालयात अनेक वेळा निवेदन दिली. तरीही याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. याप्रकरणी त्यांना लाभाथीर्र्ंनी विनंतीही केली होती. मात्र त्यांच्या विनंतीला झुगारून तक्रारीच्या निवेदनाला केराची टोपली दाखवत वंचित ठेवण्यात आले.आम्ही ज्या लोकांना घरकूल दिलेत त्यानी आम्हाला पैसे  दिले आहेत. तू पैसे दिले असते तर तुला घरकूल दिले असते अशा अनेक गोष्टी संबंधित अधिकार्‍यांकडून स.अतीक यांना ऐकाव्या लागत असल्या कारणाने त्यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन न्याय हक्क मागितला आहे.यात संबंधित अधिकार्‍यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.ग्रमीण भागात राहणार्‍या सर्वसामान्य नागरिकांवर प्रशासनातील अधिकार्‍यांकडून नेहमीच अन्याय केला जातो. पैशाच्या लालसेपोटी हे निगरगठ्ठ अधिकारी गरीब कुटुंबाला शासनस्तरावरून मिळणार्‍या अनुदानाला रोख लावून त्यांचे कुटुंब उघड्यावर ठेवण्याचे काम करताना दिसत आहेत. याला तत्काळ आळा बसविण्याची मागणी केली आहे.

अधिकारी,कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे
वगळण्यात आलेल्या यादीत माझे नाव आहे. मी एक अत्यंत गरीब लाभधारक आहे. नाव वगळण्याने माझ्या कुटुंबीयांवर मोठा अन्याय झाला आहे. स्थानिक प्रशासनासह पं.स.कार्यालयातील कर्मचारी व गट विकास अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला, पंरतु उडवा उडवीचे उत्तरे मिळाली.
- सय्यद अतिक सय्यद अजिज, वंचित लाभधारक