Sat, Feb 23, 2019 18:45होमपेज › Marathwada › पाणंदमुक्‍तीवरून दोन गटांत तणाव

पाणंदमुक्‍तीवरून दोन गटांत तणाव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंगळी : अंगद गरुड

ग्रामीण भागातील कोणत्याही खेडेगावामध्ये जमिनीच्या वादावरून दोन गटांत नेहमीच वाद निर्माण होत असतो, मात्र परभणी तालुक्यातील पिंगळी या गावात शौचास बसण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. 

त्याचे असे झाले की, येथे 25/15 अंतर्गत मागील अनेक वषार्र्ंपासून रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला पूर्वीपासूनच सकाळी व सायंकाळच्या सुमारास महिला उघड्यावर शौचास जातात, पण काही दिवसांपासून रस्त्यालगतच्या घरातील नागरिकांनी या महिलांना तेथे बसण्यास मज्जाव केला. तर दुसर्‍या भागातील नागरिकांनीही असाच प्रकार अवलंबिल्याने दोन गटात वाद उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिक उघड्यावर शौचास बसत नसल्याचा स्वच्छ भारत मिशनचा दावा पिंगळीत फोल ठरल्याचे पाहावयास मिळत आहे. पिंगळी या गावाची लोकसंख्या जवळपास 10 हजारांच्या आसपास आहे. एकीकडे जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत मिशन विभाग जिल्हा हा केवळ 6 टक्के शंभर टक्के पाणंदमुक्‍तीपासून दूर असल्याचा अहवाल शासनाकडे पाठवतो. मात्र पिंगळी येथे आजही पन्‍नास टक्के नागरिकांना वैयक्‍तिक शौचालये नाहीत. यामुळे हा अहवाल कितपत खरा आहे हे यावरूनच सिध्द होते.

200 लोक शौचालयापासून वंचित : गावातील जवळपास 200 कुटुंबाकडे वैयक्‍तिक शौचालय नाहीत. यामुळे या कुटुंबातील सर्वचजण आजही उघड्यावर शौचास जाताना दिसतात. तसेच ज्या 130 कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम केले आहे, त्यांना शासनाकडून मिळणार्‍या 12 हजारांच्या अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे.  

 

Tags : Pingali, Pingali news, toilets reason, two groups Dispute,


  •