Wed, Jan 23, 2019 14:47होमपेज › Marathwada › पावसाच्या हुलकावणीने बळीराजा धास्तावला  

पावसाच्या हुलकावणीने बळीराजा धास्तावला  

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 10:12PMपाटोदाः प्रतिनिधी

मान्सूनचे आगमन होऊन आता बरेच दिवस उलटले आहेत. तरीही  पाटोदा तालुक्यात मात्र वरुणराजाने अद्यापही हुलकावणी दिल्याने परिसरातील शेतकरीवर्ग  धास्तावला आहे. पावसामुळे बहुतांश पेरण्या खोलांबल्या आहेत,  तर योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरण्याची घाई करू नये असे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.

पाटोदा तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 77008 असून, त्यापैकी पेरणी योग्य क्षेत्र 63 हजार 313 आहे. हे क्षेत्र सरासरीच्या 82 टक्के इतके आहे. पाटोदा तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र 44 हजार 850 हे. आहे. गत वर्षी या भागातील शेतकर्‍यांनी कपाशी ऐवजी सोयाबीन ला अधिक पसंती दिल्याचे चित्र होते. जवळपास 40 टक्के क्षेत्रवर सोयाबीनचा पेरा झाला होता. यंदाही शेतकरी सोयाबीन कडेच वळण्याची जास्त शक्यात असून काही प्रमाणात कपाशी व तूर व इतर क्षेत्र येईल. हवामान खात्याचा अंदाजानुसार यंदा सर्वत्र वेळेवर पाऊस सुरू होण्याचा अंदाज होता मात्र इतर ठिकाणी जरी हा अंदाज खरा ठरला असला तरी पाटोदा परिसरात अद्याप पावसाने हुलकावणीच दिली आहे. या परिसरातील शेतकर्‍यांनी पेरणी पूर्व तयारीसाठी उसनवारी करून बी-बियाणे व इतर तयारी करून ठेवली आहे, मात्र पावसाचे आगमन लांबल्याने शेतकरी धास्तावला आहे तर ज्यांच्या पेरण्या झाल्या आहेत त्यांचे मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे.