Sat, Feb 23, 2019 21:22होमपेज › Marathwada › बजेट संपल्यामुळे पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी परतले 

बजेट संपल्यामुळे पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी परतले 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

अंबासाखर  : अ.र. पटेल

अंबाजोगाई शहरालगत असलेल्या पुरातन व ऐतिहासिक संकलेश्‍वर (बाराखांबी) मंदिर परिसराचे पुरातत्त्व विभागाच्या वतीने दहा दिवसांपूर्वी सुरू केलेले काम बजेट संपल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच बंद झाले आहे. उत्खननाचे काम सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे नागरिकांनी गर्दी केली होती.

अंबाजोगाई शहरालगत असलेल्या ऐतिहासिक संकलेश्‍वर मंदिर परिसरात पुरातत्त्व विभागाच्या वतीने उत्खननाचे काम  दहा दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते, मात्र आता येथे  पुरातत्त्व विभागाचा एक ही कर्मचारी घटनास्थळी उपलब्ध नाही.  पुरातत्त्व विभागाचे समन्वयक मयूर ठाकरे यांच्याशी या संदर्भात भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की बजेट संपल्यामुळे काम सध्या तूर्त बंद आहे. बजेट आल्यानंतर काम सुरू होईल. दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद येथील सहायक संचालक कार्यालयातील तंत्रसहायक, निलिमा मार्केडे, पुरातत्त्व समन्वयक मयुरेश खडके, स्नेहाली खडके, कामाजी डक, मुश्रीफ पठाण, सर्वेक्षक प्रल्हाद सोनकांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खननाचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरू होते. निलिमा मार्केडे यांनी सांगितले, की शासनाने निधी दिल्यावर काम सुरु होईल. परंतु निधी कधी उपलब्ध होईल हे निश्‍चित सांगता येणार नाही.

 संकलेश्‍वर मंदिराचे पुजारी सातपुते यांनी सांगितले, की उत्खननाचे काम दोन दिवसांपासून बंद असून याठिकाणी पुरातत्त्व विभागाचा एकही कर्मचारी उपलब्ध  नसल्याचे त्यांनी सांगितले.
  संकलेश्‍वर मंदिर आणि परिसर हा पूर्णपणे अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतो.   उत्खननाच्या कामाची कोणतीही माहिती तहसील कार्यालयाकडे उपलब्ध नाही. तहसीलदार संतोष रुईकर यांनी या संदर्भात भ्रमणध्वनीवरून सांगितले, की आपण स्वतः दोन वेळेस संकलेश्‍वर मंदिर परिसरास भेट दिली मात्र पुरातत्त्व विभागाच्या कर्मचार्‍यांची भेट होऊ शकली नाही. 


  •