Fri, Nov 16, 2018 20:16होमपेज › Marathwada › रुग्णांच्या लक्षणीय उपस्थितीने भारावलो

रुग्णांच्या लक्षणीय उपस्थितीने भारावलो

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 2:07AMपरभणी : प्रतिनिधी

 शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेना आ.डॉ. राहुल पाटील यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. समाजाच्या खर्‍या सेवेचे प्रतीक म्हणून अशा शिबिरांचे वारंवार आयोजन केले जावे. मी स्वत: प्रत्येकवेळी आपल्या सेवेसाठी उपस्थित राहील. आजच्या काळात काळजी करणारे सर्वच असतात, परंतु खरी काळजी घेणारा मात्र एखादाच असतो. परभणीतील रुग्णांच्या लक्षणीय उपस्थितीने भारावलो आहे, असे भावपूर्ण उद्गार डॉ. लहाने यांनी काढले.

येथील जिंतूर रोडवरील नूतन विद्यामंदिरच्या प्रांगणात शुक्रवार चौथ्या दिवशी परभणी शहर व ग्रामीण भागातील सुमारे 20 हजार रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. त्यापैकी जवळपास 16 हजार नेत्ररुग्णांची डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या समवेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. दुर्गेश पसीने, डॉ. चंद्रकिशोर पारधी, डॉ. अर्चना गोरे, डॉ. व्ही.एम. जोगदंड यांच्या पथकाने तपासणी केली.  डॉ.लहाने यांच्याकडून तपासणी करून घेण्यासाठी रूग्णांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी शिबिरात डोळे तपासणीसाठी नेत्ररुग्णांची प्रचंड गर्दी पाहून भारावलो आहे, असे प्रतिपादन डॉ. लहाने यांनी केले. डॉ. लहाने येणार असल्याचे समजल्याने शुक्रवारी सकाळपासून  रुग्णांनी शिबीरस्थिळी रांगा लावल्या. शुक्रवारी सकाळी  9 वाजता डॉ. लहाने व त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष रुग्ण तपासणीस सुरुवात केली होती.