Sun, Jul 05, 2020 03:58होमपेज › Marathwada › अनुजचे वक्तव्य नाही तर लोयांच्या मृत्यूची चौकशी महत्वाची

अनुजचे वक्तव्य नाही तर लोयांच्या मृत्यूची चौकशी महत्वाची

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लातूर : प्रतिनिधी 

अनुज लोया यांच्या विधानास महत्व न देता न्या. ब्रिजमोहन लोया यांच्या मृत्यूची चौकशी करा, अशी मागणी लातूर जिल्हा वकील मंडळाने केली आहे. वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली, त्यात ही मागणी करण्यात आली.

न्या. लोया यांच्यामृत्यूच्या चौकशी व्हावी, अशी मागणी विधीज्ञ करीत आहेत.यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकरवी राष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना निवेदनेही पाठवली आहेत. अशा वेळी न्या. ब्रिजमोहन लोया यांचे सुपूत्र अनुज यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची भेट घेऊन  आपल्या वडिलांच्या मृत्यू बाबत कसलीच शंका नाही, असे स्वत:हून म्हटले आहे. यावर लातूर वकिल मंडळाने आक्षेप घेतला असून न्या. लोया यांचा मृत्यूहा एका सामान्य माणसाचा नसून एका  न्यायधिशांचा आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी सुरू झाली तर आपल्या परिवारास त्रास होऊ शकतो, असे अनूज यांना वाटत असेल व ते टाळण्यासाठी त्यानी वडीलाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली नसावी. परंतु सत्य  उलगडण्यासाठी तसेच न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यासाठी या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे वकील मंडळाने म्हटले आहे.