Sat, Nov 17, 2018 06:43होमपेज › Marathwada › ‘घरगुती गॅस दोनशे रुपयांनी स्‍वस्‍त होणार’ 

‘घरगुती गॅस दोनशे रुपयांनी स्‍वस्‍त होणार’ 

Published On: Jan 22 2018 9:10AM | Last Updated: Jan 22 2018 9:14AMयवतमाळ : पुढारी ऑनलाईन

घरगुमी गॅस दोनशे रूपयांनी स्‍वस्‍त होण्याची शक्‍यता आहे. LPG मध्ये DAP काढून वापरला तर, गॅसच्या किमती दोनशे रूपयांची खाली येतील असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले आहे. 

नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात वरोरा-वणी महामार्गाच्या किमी चौपदरीकरणाचा आणि पिंपळखुटी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडला, यावेळी ते बोलत होते.

गडकरी म्‍हणाले, ‘‘कोळशापासून मिथेनॉल आणि मिथेनॉलपासून DAP गॅस तयार होतो. घगुती गॅसमधील LPG मध्ये अमेरिकेत २० टक्के DAP वापरतात. आपणही अशा प्रकारे कोळशापासून DAP काढून वापरला तर गॅसची किंमत दोनशे रुपयांनी कमी होऊ शकते,’’