Sun, Mar 24, 2019 08:26होमपेज › Marathwada › दस्तावेज जळीत प्रकरण ते संगणक चोरी सत्र

दस्तावेज जळीत प्रकरण ते संगणक चोरी सत्र

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:17PMपाटोदा : महेश बेदरे

तीन दिवसांपूर्वी पाटोदा पंचायत समिती कार्यालयातून नरेगा विभागाच्या कामकाजासाठी नवीन आलेला संगणक संचच गायब झाल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेसंदर्भात अद्यापही  पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता. त्यामुळे सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले. मागील वर्षी पंचायत समितीच्या दस्तावेज जळीत प्रकरणा नंतर आता ही घटना घडली तसेच नुकतीच काही दिवसांपूर्वीच जि. प . माध्यमिक शाळेतील संगणक संचांचे चोरी प्रकरण घडले. यासर्व घटनामुळे पाटोद्याच्या प्रशासकीय कार्यालयांमधील कामकाज व सुरक्षितते विषयी संशयाचा धूर कायम असून अचानक सुरू झालेल्या या सत्रामागे काय गौडबंगाल आहे ते मात्र अद्याप अस्पष्टच आहे.

पाटोदा पंचायत समिती कार्यालयात नरेगा विभागातील कामकाजासाठी नवीन आलेले संगणक संपूर्ण संचांसहित बुधवारी अचानक गायब झाले. ही बाब येथील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या लक्षात आल्याने एकच चर्चा सुरू झाली. 

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कुठलेही कुलूप न तोडता अगदी अलगदपणे हे संगणक संच गायब करण्यात आले व त्यातच हा प्रकार उघडकीस आल्या नंतर तब्बल दोन दिवसांनंतर या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली व आणखीही आश्‍चर्य म्हणजे पोलिसात या घटने बाबत गुन्हाच दाखल झालेला नाही. त्यामुळे ही चोरी नेमकी झाली कशी? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

दस्तावेज जळीत प्रकरण

मागील वर्षी मार्च 2017 व ऑगस्ट 2017 मध्ये दोन वेळा याच पंचायत समीती कार्यालयात दस्तावेज जळीत प्रकऱण घडले. आगीच महत्वाची कागदपत्रे जाळण्याचा प्रयत्न झाला होता. पहिल्या वेळी फारसे यश न आल्याने दुसर्‍या वेळी  पेट्रोल फुगे टाकून इमारतच मध्यरात्री जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या दोन्ही घटनांचा अजूनही छडा लागलेला नाही व त्यातच आता हे संगणक चोरीचे सत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

Tags : Patoda, Patoda news, Panchayat Samiti,  burning case,