Sun, Aug 25, 2019 04:12होमपेज › Marathwada › जिव देऊ नका, जमीन परत द्या; शेतकर्‍याचे पत्र

जिव देऊ नका, जमीन परत द्या; शेतकर्‍याचे पत्र

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 10:03PMबीड : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून शेतकर्‍यांच्या जमिनी सरकारपासून वाचवण्यासाठी  प्राण पणाला लावण्याची घोषणा केली होती. तर जिव देऊ नका, जगमित्र साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्या असे पत्र शेतकर्‍याने सोशल मिडियावर लिहिले.धनंजय मुंडे  मुख्य प्रवर्तक असलेल्या पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्याव्यात, जीव देण्याची गरज नाही असे  तळणी येथील शेतकरी मुंजा गित्ते यांनी म्हटले. त्यांनी  सोशल मिडियावर पत्र लिहून जाहीर दाद मागितली आहे.

धनंजय मुंडे यांची पोस्ट?

राज्यातील महामार्गासाठी लागणार्‍या जमिनी शेतकर्‍यांच्या सहमती शिवायही ताब्यात घेण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे. शेतकर्‍यांच्या सहमती शिवाय त्यांची एक इंचही जमीन मी ताब्यात घेऊ देणार नाही. त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर. हा कायदा कदापीही संमत होऊ देणार नाही. असे  धनंजय मुंडे यांनी ट्वीट केले होते. 

गप्पा कसल्या मारता : रमेश पोकळे

धनंजय मुंडे यांनी फुकटच्या गप्पा मारण्यापेक्षा परळी मतदारसंघातील गरीब शेतकर्‍याची बळकावलेली जमीन अगोदर परत द्यावी, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बुधवारी हल्लाबोल केला. रमेश पोकळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर केवळ राजकारण करणार्‍या धनंजय मुंडे यांना त्यांच्याशी कसलेही देणेघेणे नाही.  परळी मतदारसंघातील तळणी येथील मुंजा गिते नावाच्या एका गरीब शेतकर्‍याची जमीन त्यांनी लुबाडल्याचे समोर आले आहे. स्वतःच्या न झालेल्या पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी त्यांनी ही जमीन बळकावली होती असा आरोप  त्या शेतकर्‍याने पत्र पाठवून केला आहे. पूस शिवारातील गट नं. 16 मधील 3 हेक्टर 12 आर जमीन धनंजय मुंडे यांनी घेतली पण त्याचा मोबदला दिला नाही एवढेच नव्हे तर चाळीस लाखांचा खोटा धनादेश देऊन त्या शेतकर्‍याची फसवणूक केली. कुटुंबातील पाच जणांना नोकरी देण्याचे आश्वासनही कारखाना झाला नसल्याने हवेत विरले. केवळ मुंजा गितेच नाही तर अनेक शेतकर्‍यांची त्यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत असे पोकळे यांनी यात म्हटले आहे.