होमपेज › Marathwada › दिव्यांग विद्यार्थ्यांचा जिल्ह्यात सर्व्हे

दिव्यांग विद्यार्थ्यांचा जिल्ह्यात सर्व्हे

Published On: May 28 2018 1:52AM | Last Updated: May 27 2018 10:36PMबीड : प्रतिनिधी

दिव्यांग मुलांना शिक्षण देता यावे, अशी मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावेत यासाठी सध्या दिव्यांग मुलांचा जिल्हाभरात सर्वे सुरू आहेत. यावर्षी अपंग समावेशित शिक्षण अंतर्गत जिल्ह्यात दहा हजार विद्यार्थ्यांना विविध सुविधा, आर्थिक मदत देण्यात आली.

शिक्षण हक्काचा कायदा करण्यात आला असून 14 वर्षार्ंपर्यंतच्या मुला-मुलीस शिक्षण सक्तीचे व मोफत देण्यात येत आहे. सर्वसामान्य मुलांसह दिव्यांग मुलांनाही शिक्षण घेता यावे यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अपंग समावेशित शिक्षण मार्फत प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून यावर्षी जिल्ह्यातील नऊ हजार 313 विद्यार्थ्यांना विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व खासगी शाळांमध्ये यावर्षी नऊ हजार 313 दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

यातील 680 विद्यार्थ्यांना मदतनिस व्यक्तीची गरज आहे. स्वत: शिक्षण घेण्यात व यासाठी ये-जा करण्यासह इतर बाबी करण्यास अडचणी येत असल्याने त्यांना मदतनिस देण्यात येत आहे. यासाठी एका विद्यार्थ्यास वार्षिक अडीच हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे. यासह 162 दिव्यांग विद्यार्थ्यांना वार्षिक अडीच हजार रुपये प्रवास भत्ता देण्यात आला आहे. हे विद्यार्थी शाळेमध्ये दररोज उपस्थित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यासह 380 विद्यार्थ्यांना मोठ्या आकाराचे पुस्तके देण्यात आली आहेत. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देता यावे, त्यांना मदत व्हावी यासाठी 66 विशेष शिक्षक असून 23 साधन व्यक्ती कार्यरत आहेत. या नऊ हजार 313 विद्यार्थ्यांमध्ये विविध 12 प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी आहेत. यातील तब्बल 60 विद्यार्थी अंध असून एक हजार 800 विद्याथीर्र् अल्प अंध आहेत. या विद्यार्थ्यांसाठीही विशेष सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर 80 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 

आता जिल्हा परिषदेच्या वतीने पुन्हा दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण जिल्हाभरात करण्यात येत आहे. यातून जे दिव्यांग विद्यार्थी आढळतील त्यांच्यासाठी पुन्हा शिक्षणाची दारे खुली करण्यात येणार आहेत.