Mon, May 27, 2019 00:39होमपेज › Marathwada › दुसर्‍या दिवशीही झाडाझडती, दहा लाख खर्चाची फाईल गहाळ

दुसर्‍या दिवशीही झाडाझडती, दहा लाख खर्चाची फाईल गहाळ

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:36PMबीड : प्रतिनिधी

येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या कारभाराची क्रीडा उपायुक्त चंद्रकांत कांबळे यांनी शनिवारीही झाडाझडती घेतली. कार्यालयातील तत्कालीन कर्मचारी याने दहा लाखांच्या कामात अनियमितता केल्याची चौकशी त्यांनी केली, मात्र या कामाची फाईल त्यांना मिळाल्या नाहीत. बीड येथील क्रीडा संकुलासाठी दोन कोटी रुपयांच्या कामांचा प्रश्‍न त्यांनी मार्गी लावला शिवाय वडवणी व माजलगाव येथे क्रीडा संकुलासाठी जागेचा प्र्रश्‍नही सुटला.

बीड जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अनेक तक्रारी पुणे क्रीडा आयुक्तांकडे गेल्या आहेत. या तक्रकारीची चौकशी करण्यासाठी क्रीडा उपायुक्त चंद्रकांत कांबळे बीड येथे आले होते. तत्कालीन कर्मचारी मारोती सोनकांबळे यांनी पायका योजनेत दहा लाख रुपयांचा गपला केल्याची तक्रार होती. या संदर्भात कांबळे यांनी चौकशी केली. या कामाच्या काही फाईल त्यांना मिळाल्या नाहीत.