Sun, Jul 21, 2019 16:57
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › ‘शेतकर्‍यांना योग्य पीकविमा वाटप करा’

‘शेतकर्‍यांना योग्य पीकविमा वाटप करा’

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:03PMपाथरी ; प्रतिनिधी

एका खासगी विमा कंपनीकडून विमाधारक शेतकर्‍यांना अल्प प्रमाणात विमा  रकमेचे वाटप  करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाप्रति शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होत असून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने विमा कंपनीला तत्काळ उचित आदेश द्यावेत, अशी मागणी आ. मोहन फड यांनी केली आहे. 

10 एप्रिल रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेऊन आ. फड यांनी मागणीचे पत्र त्यांना दिले. पाथरी मतदारसंघासह परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कापूस, सोयाबीन, तूर व इतर पिकांचा विमा शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ऑनलाइन पद्धतीने विमा कंपनीकडे मोठ्या प्रमाणात विमा भरणा केला होता. सन 2017-18 मध्ये अपुर्‍या व अवेळी पडलेल्या पावसामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून शासनास सादर झालेल्या पीक आणेवारी सुद्धा सर्वसाधारणपणे 50 पैशांपेक्षा कमी आहे. असे असूनही विमा कंपनीने चुकीचे निकष लावून शेतकर्‍यांना अल्प प्रमाणात विमा मंजूर केलेला आहे. त्यामुळे विमा कंपनीला तत्काळ उचित आदेश द्यावेत, अशी मागणी आहे.

Tags : Marathwada, Distribute, right, crop, insurance, farmers