Sat, Mar 23, 2019 16:36होमपेज › Marathwada › अतिरिक्त पदभारची तालुक्यात चर्चा

अतिरिक्त पदभारची तालुक्यात चर्चा

Published On: Feb 14 2018 2:53AM | Last Updated: Feb 14 2018 2:31AMअंबासाखर : अ.र. पटेल

अंबाजोगाई जिल्हा करावा या मागणीसाठी सध्या   प्रयत्न सुरू आहे. जिल्हा निर्मितीसाठी लागणारे सर्व शासकीय कार्यालयाचे उपविभागीय कार्यालय तसेच अतिरिक्त  कार्यालयाचे अधिकारी कार्यरत आहेत. पदाच्या अधिकारापेक्षा अतिरिक्त पदभार असणारे प्रभारी अधिकारीच भारी ठरत असल्याचे दिसत आहे. 

स्वा.रा.ती.ग्रा.वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय अंबाजोगाई येथे आहे. डॉ. लेमाडे, डॉ. चव्हाण दहा वर्षांपूर्वी अधिष्ठाता म्हणून कार्यरत होतेश मात्र त्यानंतर पदाचा अधिष्ठाता आलाच नाही. अधिष्ठाता पदी गेल्या अनेक वर्षांपासून याच महाविद्यालयातील जेष्ठ डॉक्टरांकडे अतिरिक्त पदभार दिला जातो. सध्या डॉक्टर सुधीर देशमुख प्रभारी अधिष्ठाता तर डॉ.बिराजदार यांच्याकडे प्रभारी अधीक्षक म्हणून कार्यभार आहे. अंबाजोगाईला अतिरीक्त जिल्हाधिकारीसह भूसंपादन अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. अतिरीक्त जिल्हाधिकारी म्हणून काही महिन्यापूर्वी कांबळे रुजू झाले आहेत. याही पदाचा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अतिरिक्त पदभार असायचा किंवा बीडच्या अतिरिक्त  जिल्हाधिकार्‍यांकडे अंबाजोगाईचा पदभार सतत राहिला आहे. भूसंपादन अधिकार्‍याची पदे मंजूर झाल्यापासून कायम अतिरिक्त पदभार असल्याने अनेकवेळा शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या की कायम स्वरुपी अधिकारी नसल्यामुळे शेतीच्या मावेजा प्रकरणात निकाल लागत नाही, त्यामुळे अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकार्‍याकडे दोन्ही विभागाचा पदभार दिला आहे.     अंबाजोगाई पंचायत समितीचा गटविकास अधिकारी, महिला व बालकल्याण विभागाच्या प्रकल्प अधिकारी असे दोन वेगवेगळे कार्यालय असले तरी एकाच अधिकार्‍याकडे बरीच वर्षे दोन पदभार प्रशासनाने ठेवले आहेत. अतिरिक्त पदभार देण्यासाठी पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांमध्ये कायम चढाओढ लागते. कारण ज्याने पदभार मिळवून दिला त्याच्या पारड्यात प्रभारी वजन टाकतात असा तक्रारी आहेत. प्रकल्प अधिकारी पदाचा आजही अतिरिक्त पदभार उप बीडीओ विठ्ठल नागरगोजे यांच्याकडे आहे. शिक्षण विभागातही वेगळी परिस्थिती नाही. गटशिक्षण अधिकारी पदावर अनेक शिक्षण विस्तार अधिकारी तसेच केंद्रीय शाळेच्या मु.अ.कडे अतिरिक्त पदभार होता. मात्र विद्यमान ग.शि.अ.शिंदे पदाचे असल्याने प्रभारीची परंपरा खंडित झाली. जिल्हा परिषद खात्याचे लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाला पदाचे उपअभियंता गेली 17 वर्षांत आलेच नाही. या विभागात कार्यरत असणार्‍या शाखा अभियंच्याकडे अतिरीक्त पदभार देऊन कामकाज चालविले गेले.   जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत परळी व अंबाजोगाई अशा दोन तालुक्यांचा कारभार चालतो.