Wed, Mar 20, 2019 12:43होमपेज › Marathwada › धारूर पोलिसांनी अवैध दारू,गुटखा पकडला 

धारूर पोलिसांनी अवैध दारू,गुटखा पकडला 

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 10:43PMबीड : प्रतिनिधी  

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बीड तालुक्यातील पिंपळनेर, धारूर व वडवणी तालुक्यातील घाटसावळीनजीक कारवाई करत लाख रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्‍त केले. धारूर पोलिस ठाणे हद्दीत एका जीपसह अवैध दारू व साहित्य असा 8 लाख  77 हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला. त्यात जीप 8 लाख रुपये, एका मोटार सायकाल, देशीदारूचे 17 बॉक्स याचा समावेश आहे.

दुसरी कारवाई वडवणी तालुक्यातील घाटसावळीनजीक केली. नाथापूर येथील सिंदफणा नदीतून अवैधरित्या वाळू घेऊन जाणारा ट्रकसह 9 लाख रुपयांचा माल पकडला. तिसरी कारवाई याच परिसरात करण्यात आली. एका जीपमधून  2 लाख 17 हजार रुपयांचा गुटखा व एक कार असे मिळून 9 लाख 20 हजार असे मुद्देमाल पकडला. अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख फौजदार कैलास लहाने, पोहेकॉ. पी. टी.चव्हाण, पो. ना. राहुल शिंदे, संजय चव्हाण, विजय पवार, महेश चव्हाण, जयराम उबे यांनी केली.