Sun, Mar 24, 2019 04:10होमपेज › Marathwada › देशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

देशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:20PMवसमत : प्रतिनिधी

देशात घडत असलेल्या बलात्कारांसाठी जलदगती न्यायालय स्थापन करून अशा गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी व अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेत अशा घटना थांबत नसल्यास वर्तमानात शासन कायदा सुव्यवस्था सांभाळण्यास अपयशी ठरल्या कारणाने ते बरखास्त करून देशात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी महा मूक मोर्चात सर्वधर्मीयांनी केली आहे. या महा मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

उन्नाव (उत्तर प्रदेश), सुरत (गुजरात), कठुआ (जम्मू काश्मीर), परभणी (महाराष्ट्र) येथे झालेल्या बलात्कारांच्या घटना या माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना असून सदर घटनांचा तीव्र निषेध नोंदवून संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी व कठोर कायदा अंमलात आणावा. यासह विविध मागण्यांसाठी दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता गडी मोहल्ला येथूल सर्वधर्मीयांचा महा मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मुख्य मार्गाने उपविभागीय कार्यालय वसमत येथे पोहचून तेथे धरणे आंदोलन करण्यात आले. लहान मुलींच्या हस्ते महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन  देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, भारत देश हा जगात सर्वांत मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून ओळखला जातो, परंतु मागील चार वर्षांपासून देशाचे राजकीय वातावरण बदलल्यामुळे देशातील सामाजिक वातावरणावरही त्याचा परिणाम एका धर्माचे दुसर्‍या धर्माविषयी रक्तरंजीत द्वेषभाव, बलात्कार स्वरूपात दिसायला लागले आहे. विविधतेत एकात्मता अशी विशेष ओळख असणार्‍या भारत देशाला काही समाजकंटक, देशद्रोही राजकीय पाठबळावर, राजकीय फायद्यासाठी कायदा हातात घेऊन गंभीर स्वरूपाचे कृत्य घडवून आणीत आहेत. ते लोकशाहीला आणि देशासाठी घातक आहे. अशा गुंडमवालींना सत्ताधारी राजकीय पाठबळ असल्याने त्याना शासनाचे व व्यवस्थेची कोणतीही भीती राहिलेली नाही.

एकंदरीत पाहता मानवजातीला काळिमा फासणार्‍या या बलात्काराचे गुन्हे जे घडत आहे. त्यावर कुठेतरी अंकुश लावण्यासाठी  सदरील प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिल्यास पीडितेला न्याय मिळेल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महा मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. शहरातील व्यापार पेठ बंद ठेऊन व्यापार्‍यांनी सहभाग घेतला होता. लोकप्रतिनिधी, सर्वधर्मीय समाजबांधव हजारोंच्या संख्येने महा मूक मोर्चात सहभागी झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Tags : Marathwada, Demand, Presidents, rule,  country