Wed, Nov 21, 2018 12:16होमपेज › Marathwada › मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंची पदवी गहाळ

मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंची पदवी गहाळ

Published On: Feb 09 2018 3:14PM | Last Updated: Feb 09 2018 2:55PMऔरंगाबाद : प्रतिनिधी  

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरूंची पदवी गहाळ झाली आहे. यासंदर्भातील तक्रार बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. २२ जानेवारी २०१८ रोजी पदवी विद्यापीठ परिसरातून गहाळ झाली आहे. 

कुलगुरू चोपडे यांनी १९७४ मध्ये कराड कॉलेजमधून प्री-डिग्री सायन्स या विषयाची पदवी मिळवली होती. २०१४ मध्ये त्यांची  कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

कुलगुरू चोपडे यांनी १९७८ मध्ये शिवाजी विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवी मिळवली. त्यानंतर १९८० मध्ये एमएसस्सीची पदवी मिळवली. तसेच इंग्लंड येथील नॉटिंगहॅम विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. १९९४ ते १९९६ या काळात त्यांनी शिकागो येथील विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरल पदवी मिळवली.