Wed, Nov 21, 2018 17:35होमपेज › Marathwada › माजलगावमध्ये शौचालयांचा बोजवारा

माजलगावमध्ये शौचालयांचा बोजवारा

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 10:08PMमाजलगाव : सुभाष नाकलगावकर

शहर पाणंदमुक्त करण्यासाठी पालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहेत. या शौचालयांचा आता बोजवारा उडाल्याने हे शौचालय केवळ राज्य व केंद्राच्या पथकाला दाखविण्यासाठी बांधले होते का? असा प्रश्‍न सामान्यांना पडत आहे. 

शहरातील काही नागरिकांनी शौचालय न बांधता केवळ अनुदान उचलल्याचीही चर्चा आहे. सर्वांना शौचालय बांधावयास लावण्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा पालिकेला तगादा आहे. यामुळे काहींचे कागदोपत्रीच शौचालय पूर्ण दाखविण्यात आल्याचीही चर्चा आहे.पालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय बांधले आहे. यावर लाखोंची उधळण झाली आहे. आता हे शौचालय केवळ शोभेची वास्तू झाले आहेत. प्रभाग क्र.2 मध्ये बांधण्यात आलेल्या दोन शैचालयात पाण्यासह नळाच्या तोट्या पाण्याच्या टाक्या ठेवल्या होत्या. मात्र आज त्या ठिकाणी हे सर्व गायब झाले आहे. बोरवेल मधील पाण्याची मोटारसह सर्व वस्तूही गायब आहेत. या शौचालयाची मोडतोड केल्यामुळे  शौचालयाचा बोजवारा उडाला आहे. या कडे लक्ष देण्यास न. प. ची सक्षम यंत्रणा नसल्याने याच पद्धतीने शहरातील सर्वच सार्वजनिक शौचालयाची अशी दुरवस्था झाली आहे.  केवळ कागदावरच माजलगाव शहर हगणदारी मुक्त झाले आसल्याचे यामुळे  दिसून येत आहे.