होमपेज › Marathwada › अज्ञात वाहनाच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 10:21PMकेज : प्रतिनिधी

केजहून नांदूरकडे पती, पत्नी व त्यांची दोन मुले दुचाकीवर जात होते. अज्ञात वाहनाच्या धडकेत पतीचा मृत्यू झाला तर पत्नी व दोन मुले जखमी झाले. जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  रविवारी रात्री आठच्या सुमारास केजपासून एक किलोमीटर अंतरावरील पद्मा जिनिंग जवळ हा अपघात झाला.

नांदूर येथील सय्यद रोफ हमजा हे पत्नी सुलताना व मुले अरमान (वय दहा), मदिना (वय पाच) यांच्यासह दुचाकीवरून (एम एच 16 एस 6838) केज येथून नांदूरला रविवारी रात्री जात होते. आठच्या सुमारास केजपासून जवळ असलेल्या पद्मा जिनिंग जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात सय्यद रोफ हमजा यांचा जागीच मृत्यू झाला  झाला. पत्नी सुलताना रोफ सय्यद यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. मुले अरमान रोफ सय्यद व मदिना रोफ सय्यद यांच्या पायाला मार लागल्याने फॅक्‍चर झाले. अपघाताची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीना खासगी वाहनातून उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Tags : Beed, unknown vehicle accident, husband,Death,