Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Marathwada › वसतिगृहात विष प्राशन केलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

वसतिगृहात विष प्राशन केलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Published On: Feb 04 2018 2:45PM | Last Updated: Feb 04 2018 2:43PMनांदेड : प्रतिनिधी

माधव संजय साडेराव (रा. लोहा ता. हदगाव) या विद्यार्थ्याने शनिवारी सायंकाळच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच आज (रविवार) माधव यांचा मृत्यू झाला. 

यापूर्वी ही समाजकल्याण सहाय्य आयुक्‍त कार्यालयातंर्गत चालवण्या येणाऱ्या शहरातील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याचा विष प्राशान केल्याने मृत्यू झाला होता. तर काही दिवसापूर्वीच हदगाव येथील वसतिगृहात मुलीने गळफास घेतला होता. या घटनेमुळे विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे.