Thu, Jan 17, 2019 00:48होमपेज › Marathwada › धनाजी देशमुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू

धनाजी देशमुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Published On: Dec 18 2017 2:36AM | Last Updated: Dec 17 2017 11:43PM

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाची टाकी फुटून मृत्यू पावलेल्या कर्मचार्‍यांची संख्या आता सात झाली आहे. रविवारी सकाळी  धनाजी राजेश्‍वरराव देशमुख यांचे उपचार चालू असताना निधन झाले. देशमुख यांच्या पश्‍चात आई, दोन भाऊ, दोन मुले, बहिणी असा परिवार आहे.

दि. 8 डिसेंबर रोजी वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत 12 जण भाजून जखमी झाले होते. जखमींना लहाने हॉस्पिटलमध्ये  दाखल केले होते. कारखान्यातील कर्मचारी सुभाष कराड (लिंबोटा), सुमित भंडारे, सुनील भंडारे (देशमुख टाकळी), गौतम घुमरे (गाडे पिंपळगाव), राजाभाऊ नागरगोजे (मांडेखेल), मधुकर आदनाक (धानोरा), धनाजी राजेश्‍वरराव देशमुख यांचा मृतांमध्ये समावेश आहे.