Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Marathwada › पीकविम्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन

पीकविम्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन

Published On: May 28 2018 1:52AM | Last Updated: May 27 2018 10:57PMपरभणी : प्रतिनिधी

यावर्षी खरीप हंगामात पिकांच्या विम्याकरिता शासनाने पूर्वीच्या कंपनीकडून विम्याच्या रकमेबाबत मोठा वाद उद्भवल्यानंतर बदल केला आहे. आता इफ्को टोकियो जनरल इंशुरन्स या कंपनीला कंत्राट दिले. यात शेतकर्‍यांना विमा भरणा करण्याकरिता 1 ते 31 जुलै ही अंतिम डेडलाईन दिली आहे. 

गतवर्षी जिल्हाभरातील असंख्य शेतकर्‍यांनी खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा विमा रिलायन्स कंपनीकडे उतरवला होता, पण या कंपनीकडून शेतकर्‍यांचीं मोठी दिशाभूल झाल्याने सर्वत्र नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या कंपनीविरोधात आलेल्या शेतकर्‍यांच्या तक्रारी लक्षात घेत शासनाने आता विमा कंपनी बदलली आहे. या वर्षात तोच गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून शासनाने परभणी जिल्ह्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स या कंपनीची निवड केली आहे. 

नुकसानभरपाई मिळेल या आशेने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात मागील दोन वषार्र्ंपासून रिलायन्स इन्शुरन्स या कंपनीकडे हा विमा भरणा केला होता. 2016 मध्ये खरीप हंगामात शेतकर्‍यांनी 36 कोटी रुपयांचा विमा भरला होता. यानंतर रिलायन्स कंपनीने जिल्ह्यात एकूण 38 पैकी 15 मंडळातील शेतकर्‍यांना विमा मंजूर करून रक्‍कम त्यांच्या खात्यावर वर्ग केला. यामुळे अनेक शेतकर्‍यांनी कंपनीविरोधात आपला रोष व्यक्‍त केला.

2017 मधील खरीप हंगामात 2 लाख शेतकर्‍यांनी विमा उतरविला होता. मात्र कंपनीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली दुष्काळ आकडेवारी व पीक पैसेवारीकडे दुर्लक्ष केले. या सर्व प्रकाराने जिल्हाभरात संताप व्यक्‍त झाला. यानंतर संघटना व राजकीय पक्षांनी आंदोलने करत शासनाला निवेदने दिली. याची दखल घेत शासनाने रिलायन्स कंपनीला बदलून आता नवीन कंपनी विम्यासाठी परभणीकरिता आणली आहे. 

या पिकांचा समावेश असून होणारी पैशांची आकारणी

सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल, तांदूळ या पिकांचा समावेश आहे. यात पिकांचा 70 टक्के जोखीमस्तर आहे. यासाठी हेक्टरी भरावयाची विमा रक्‍कम व कंसात विमा संरक्षित रक्‍कम दर्शवली आहे. 

यात तांदूळ-800 (40 हजार), ज्वारी-480(24 हजार), बाजरी-400 (20 हजार), सोयाबीन-840 (42 हजार), सूर्यफूल-462 (23 हजार 100 रुपये), मूग-378 (18 हजार 900 रुपये), उडीद-378(18 हजार 900 रुपये), तूर-630(31 हजार 500 रुपये), कापूस-2 हजार 100 रुपये(42 हजार) अशी रक्‍कम विमा संरक्षित केली आहे.