Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Marathwada › हिंगोली : शवागारातील मृतदेह उंदरांनी कुरतडला

हिंगोली : शवागारातील मृतदेह उंदरांनी कुरतडला

Published On: Mar 02 2018 10:35AM | Last Updated: Mar 02 2018 10:35AMहिंगोली : प्रतिनिधी

शवागारात ठेवण्यात आलेला मृतदेह उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसमत येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवलेल्या मृतदेहाचे उंदरांनी लचके तोडल्याचा प्रकार समोर आला. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,‘वसमत तालुक्यातील कौठा येथील सुधीर खराटे यांचा गुरुवारी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवला होता. पण शवागारात त्यांच्या मृतदेहाचे उंदरांनी लचके तोडल्याचा प्रकार आज उघडकीस आला. या प्रकारानंतर संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली. जो पर्यंत दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत प्रेत हलवणार नसल्याचा पवित्रा घेत रुग्णालयासमोर नातेवाईकांसह लोकांनी गर्दी केली आहे.