Mon, Aug 19, 2019 00:39होमपेज › Marathwada › धोकादायक इमारती नागरिकांच्या मुळावर

धोकादायक इमारती नागरिकांच्या मुळावर

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 11:16PMबीड : दिनेश गुळवे

शहरातील नागरी वसतीतील मोडकळीस आलेल्या इमारती पादचारी, नागरिकांच्या मुळावर आल्या आहेत. अशा इमारत असलेल्या मालकांना पालिकेने नोटीस दिल्या आहेत. पावसाळ्यात अशा इमारती पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी पालिकेच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. 

पावसाळा तोंडावर आल्याने बीड नगर पालिकेच्या वतीने पूर्वतयारीची कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांमध्ये धोकादायक इमारतींचा आढावा घेण्याचेही काम आहे. बीड शहरातील टिळक रोड, जुने बीड, राजुरी वेस यासह इतर काही भागामध्ये मोडकळीस आलेल्या एक व दुमजली इमारती आहेत. अशा इमारतींचा नगर पालिकेच्या अभियंत्यांनी पाहणी घेऊन तसा पालिकेला अहवाल सादर केला आहे. यावरून पालिकेने संबंधित इमारत मालकास नोटीस बाजवून दुरुस्ती करण्याची वा इमारत पाडण्याचे सूचविले आहे. 

बीड शहरातील काही भागामध्ये मोडकळीस आलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या 13 इमारती आहेत. पावसाळ्यात अनेकदा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये पावसाचे पाणी मुरल्यानंतर इमारत पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. 

अशा घटना घडल्यास रहिवासी, इमारतजवळ राहणारे शेजारी व तेथून जाणारे पादचारी यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. या अनुषंगाने बीड शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये काही इमारतींना दुुरुस्ती सुचविण्यात आली असून काही इमारत पाडण्याचे बजावण्यात आले आहे.