Fri, Jul 19, 2019 07:16होमपेज › Marathwada › सिलेंडर गॅसची टाकी फुटली,  लाखोंचे नुकसान 

सिलेंडर गॅसची टाकी फुटली,  लाखोंचे नुकसान 

Published On: Dec 15 2017 7:06PM | Last Updated: Dec 15 2017 7:06PM

बुकमार्क करा

कळमनुरी : प्रतिनिधी

कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी येथे कोंडबाराव गुहाडे यांच्या घरात सिलेंडर गॅसची टाकी फुटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. गुहाडे यांचे या घटनेत जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले. गुहाडे यांचे कुटुंब मोलमजुरी करिता बाहेर गेले असल्याने सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ढोलक्याची वाडी येथे कोंडबाराव गुहाडे हे त्यांच्या पत्नी व दोन मुलांसह मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. गावाच्या एका बाजूला त्यांचे घर आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरातील सिलेंडरची टाकी अचानक फुटली. यात घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. टाकीचा स्फोट एवढा भीषण होता की, घरावरील तीन पत्रे तुटून खाली पडले. 

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतिष पाचपुते यांनी घटनास्थळी भेट देत गुहाडे यांच्या कुटुंबाला दहा हजाराची मदत दिली. याबाबत तहसीलदा आणि पोलिस ठाण्याला माहिती दिल्यानंतर तहसीलदारांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिस या घटनेची नोंद घेत तपास करीत असल्याचे कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी.एस.राहीरे यांनी सांगितले.