Sun, Mar 24, 2019 04:56होमपेज › Marathwada › मजुरांअभावी कापूस वेचणी रखडली

मजुरांअभावी कापूस वेचणी रखडली

Published On: Mar 24 2018 2:15AM | Last Updated: Mar 24 2018 2:14AMअंबाजोगाई :  रवी मठपती 

मजुरांअभावी शेतकर्‍यांचा पांढरा सोन समजल्या जाणार्‍या कापसाची वेचणी अजूनही रखडली आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी परेशान आहेत. एकीकडे मजूर मिळत नसले तरी कामानिमित्त गावातून स्थलांतर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कापूस वेचणीला महिन्यापूर्वीच आला असला तरी मजुराच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना अजूनही ताळमेळ लागला नाही. 

कापूस वेचणीअभावी कापूस झाडावर राहून वाया जात आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. यावर्षी शेतकर्‍यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. कापसावर पडलेल्या शेंदरी बोंड आळी ने कापसाचे पूर्ण पीक फस्त केले. काही ठिकाणी मात्र कापसाची पहिली वेचणी पूर्ण झालेली आहे. दुसर्‍या वेचणीला मजूर मिळेनासे झाले आहेत. मजूर मिळविण्यासाठी मजुरी वाढवून द्यावी लागत आहे. त्याचप्रमाणे मजुरांना परगावाहून ने-आण करण्याकरिता वाहन व्यवस्था करावी लागत आहे. 

अतिरिक्त खर्च शेतकर्‍यांच्या खिशाला परवडणारा नाही. त्यामुळे मजुरांअभावी कापूस तसाच झाडाला लटकून आहे. सातत्याने निसर्गाचा कोप शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. त्याबरोबर  मजुरांची उपलब्धी नसल्याने नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जास्तीचे उत्पन्न झाल्यावर बाजारभाव मिळत नाही असा अनुभव शेतकर्‍यांना येतो आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आवक असलेल्या टोमॅटो , कोथिंबीर, व कोबी या भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.  मोठ्या अपेक्षेने शेतकरी वेगवेगळ्या पिकांची व भाजीपाल्यांची लागवड करतात. परंतु निसर्गासोबतच अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. शेतात माल असूनही अनेक अडचणींमुळे खिशात पैसा राहत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

Tags : Marathwada,Marathwada News, Cutting cotton, due to laborers missed