Thu, Apr 25, 2019 15:40होमपेज › Marathwada › मराठा आरक्षणासाठी विष घेतलेल्या तरुणावर उपचार सुरू

मराठा आरक्षणासाठी विष घेतलेल्या तरुणावर उपचार सुरू

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 12:56AMपरभणी : प्रतिनिधी

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 26 जुलै रोजी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास हिंसक वळण मिळून शहरात दगडफेक होत असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरम्यान या आंदोलनात सहभागी असलेल्या एका 18 वर्षीय तरुणाने पोलिसांच्या झालेल्या अमानुषपणे लाठीचार्जमुळे जखमी झाल्याने आरक्षणासाठी मार खावा लागत असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याने त्याने 27 जुलै रोजी याच भावनेच्या भरात सकाळी 8 वाजता विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

परभणी तालुक्यातील वाडी दमई येथील रहिवासी रामेश्‍वर मुरलीधर गायकवाड (वय 18 वर्षेे) असे त्या तरुणाचे नाव आहे. बोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात इयत्ता 11 वीत तो शिक्षण घेत आहे.  आंदोलनात रामेश्‍वर गायकवाड सहभागी झाला होता. आंदोलनस्थळी बसलेल्या रामेश्‍वरला पोलिसांनी बेदमपणे काठीने मारहाण केली. न्याय मागणी घेऊन शांततेत बसलेला रामेश्‍वर पोलिसांचा अन्याय डोळ्याने पाहत होता. रात्री आपल्या घरी आल्यानंतर आरक्षण विवंचनेत त्याने जेवण केले नाही. आई-वडिलांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने आरक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यातूनच शुक्रवारी सकाळी 8 वाजता पिकांना फवारणीस आणलेले विषारी औषध घेऊन स्वतःचे जीवन संपविण्याचा प्रयत्न केला, असे त्याचे आई-वडील व   काका उध्दव गायकवाड यांचे म्हणणे आहे. गावातील नागरिकांनी त्यास तातडीने परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.