होमपेज › Marathwada › कंटेनर-कारची धडक; दोघेजण जागीच ठार 

कंटेनर-कारची धडक; दोघेजण जागीच ठार 

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 10:54PMआष्टी : प्रतिनिधी 

आष्टीहून जामखेडकडे जात असलेल्या कंटेनरने  पुण्याहून भूमकडे जात असलेल्या इंडिका कारला जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील एका पुरुषासह एक महिलेला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर कारमधील अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना बुधवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास आष्टी-जामखेड रस्त्यावरील आष्टाफाटा येथे घडली. 

पोलिसांनी सांगितले, अहमद इकबाल पठाण व नसरीन मुन्नवर पठाण (रा. गरड गल्ली भूम, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत, तर या अपघातात मुन्नवर अब्बासअली पठाण, करिश्मा मुन्नवर पठाण, अर्शिया मुन्नवर पठाण (सर्व रा. गरड गल्ली भूम, जि. उस्मानाबाद) हे तिघे जखमी झाले आहेत.  इंडिका कारमधून (एम.एच.25 ए 3310) नसरीन मुन्नवर पठाण, मुन्नवर अब्बासअली पठाण, करिश्मा मुन्नवर पठाण, अर्शिया मुन्नवर पठाण हे पुण्याहून भूमकडे निघाले होते. अहमद पठाण यांच्या कारच्या मागे तौफिक पठाण क्रुझर जीप चालवत होते. दोन्ही वाहने बुधवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास आष्टी-जामखेड रस्त्यावरील आष्टाफाटा येथे आलेले असताना जामखेडकडे निघालेल्या कंटेनरने (एम.एच.43 यू 7919) इंडिका कारला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील अहमद इकबाल पठाण व नसरीन मुन्नवर पठाण यांना गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.  कंटेनर  चालकाविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.