Mon, Nov 19, 2018 04:11होमपेज › Marathwada › इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने ओढला गाडा

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने ओढला गाडा

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 10 2018 12:36AMहिंगोली : प्रतिनिधी

काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वारंवार वाढ होत असल्याने काँंग्रेसने हातागाडा ओढून याचा निषेध नोंदवला आहे.  या इंधन वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी दि.9 एप्रिल रोजी दुपारी चक्क हातगाड्यावर स्कुटी ठेऊन पदाधिकार्‍यांनी गाडा ओढला.सर्व सामान्य वाहनधारकांना या वाढीच्या झळा सोसाव्या लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.यावेळी हिंगोली मतदार संघाचे खासदार राजीव सातव, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव सीमा हाफीज, विलास गोरे, भागोराव राठोड, ज्ञानेश्‍वर जाधव, राजाराम खराटे, गोरख पानपट्टे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Tags : Marathwada, Congress, pulls,  Gada, against,  fuel, price, hike