Wed, May 22, 2019 15:00होमपेज › Marathwada › जिल्ह्यातील सर्व शाळांची उद्यापर्यंत कसून तपासणी

जिल्ह्यातील सर्व शाळांची उद्यापर्यंत कसून तपासणी

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 29 2018 12:14AMपरभणी : प्रतिनिधी

शासनमान्य ठिकाणी शाळा भरते की नाही. आरटीई प्रवेश पात्रतेनुसार विद्यार्थ्यांची निवड होते का नाही, या निकषांची पूर्तता आहे का नाही, यासह अन्य बाबींकरिता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांची तपासणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. यात 25 जूनपासून ही तपासणी सुरू आहे. 30 जून ही तपासणी पूर्ण करण्याकरिता अंतिम मुदत आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा 25 ते 30 जून या कालावधीत शासन नियमानुसार चालतात की नाही याची शहानिशा करण्याकरिता त्यांची तपासणी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आलेले आहेत. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील शिक्षण विभागांतर्गत असलेले विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्यामार्फत ही तपासणी पूर्ण करावयाची आहे. या तपासणीत शासनाच्या मान्यतेनुसार शाळा सुरू केली का नाही, शाळेचा सध्याचे ज्ञानार्जन देत असलेले ठिकाण, पत्ता, मान्यतेचे माध्यम व सध्या शाळेत शिकवत असलेेल माध्यम, शासनाने मान्यता दिलेेले वर्ग, शाळेची विद्यार्थी संख्या, आरटीईनुसार लादलेले निकषात काम आहे का नाही, शाळा मान्यता शिक्षक संख्या तसेच आरटीईच्या दहा निकषांची पूर्तता इत्यादी बाबींची या कालावधीत कसून तपासणी केली जाणार आहे. या आदेशात एकाच दिवशी शाळा तपासणी करण्याचे आदेश दिले होते, परंतु एकाच दिवसात संपूर्ण शाळांची तपासणी करणे शक्य नसल्याने यात फेरबदल करण्यात आला आहे. यासाठी शाळा तपासणीकरिता संबंधितांना आता 30 जूनपर्यंत कालावधी शिक्षणाधिकार्‍यांनी दिला आहे.